Breaking News

गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा -वर्षा ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विद्यार्थी आपल्या गुरूकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षकानेही आपले आचरण चांगले ठेवायला हवे व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्या वर्षा ठाकूर यांनी केले.

गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 15) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला इंग्लिश विषय सहाय्यक संजय पाटील, पालक प्रतिनिधी उपाध्यक्ष जयंत पाटील, पालक प्रतिनिधी सचिव के. साधना, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सुभाष मानकर, प्रशांत मोरे, संध्या अय्यर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी मार्गदर्शन करीताना गुरूमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंधःकार दूर होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरू असावा, असे सांगितले. संजय पाटील यांनी, आपल्याला गुरूचे महत्त्व समजावे यासाठी आपण प्रत्येकवर्षी गुरूपौर्णिमा साजरी करतो. गुरूमुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि या संस्कारांची शिदोरी घेऊन आपण समाजात ताठ मानेने जगू शकतो, असे सांगत गुरूचे महत्त्व विशद केले.

दरम्यान, कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर अ‍ॅक्टिव्ह टीचर, अ‍ॅक्टिव्ह प्रिन्सिपल, अ‍ॅक्टिव्ह आर्ट टीचर तसेच अ‍ॅक्टिव्ह स्कूल अवॉर्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान गुरू-शिष्याचा महिमा वर्णन करण्यासाठी स्नेहल कडव यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याविष्कार सादर करण्यात आला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply