पनवेल ः परदेशातून अवैधरित्या आयात केलेला 362.59 कोटी रुपयांचा हेरॉईन नामक अमली पदार्थ पनवेल तालुक्यातील अजिवली येथील नवकार लॉजिस्टिकमध्ये जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. दुबई येथून कंटेनरमध्ये अमली पदार्थ दडवून न्हावाशेवा पोर्ट येथे आणल्याची व हा माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेला पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलकडून मिळाली होती. याबाबत अधिक तपास केला असता तो कंटेनर नवकार लॉजिस्टीक येथे उतरविण्यात आल्याचे पोलीस पथकाला कळले. तेथे जाऊन त्याची तपासणी केली असता मार्बल्समध्ये 72.518 किग्रॅ वजनाचे आणि सुमारे 362.59 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन आढळले. ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …