Breaking News

दिघ्यात संरक्षक भिंतीमुळे फुटपाथची दुरवस्था

नवी मुंबई : बातमीदार

दिघा विभागातील मुकुंद कंपनी लगत रामनगर जवळ अमीन कंपनीने भूखंड क्र. बी-01 येथे मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू आहे. अमीन कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत त्या भिंती लगतच महापालिकेने नागरिकांना ये जा करण्यासाठी फुटपाथ बांधण्यात आलेला आहे, परंतु संरक्षण भिंतीच्या कामामुळे संपूर्ण फूटपाथची दुरावस्था ही झालेली आहे.

अमीन कंपनीने फुटपाथचा काही भाग हा संरक्षण भिंत बांधण्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळे फुटपाथची जागादेखील कमी झालेली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने संपूर्ण खराब झालेल्या फुटपाथचा खरच हा खाजगी अमीन कंपनीकडून वसूल करावा तसेच महापालिकेच्या फुटपाथवर संरक्षण भिंत बांधल्यामुळे त्यांच्याकडून त्या जागेची किंमत वसूल करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवनसिंग ठाकूर यांच्या माध्यमातून दिघा विभाग अधिकारी यांना करण्यात आली आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुभाष काळे, अमित मिश्रा, दीपक उपाध्याय, योगेश अभंग शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply