पनवेल, उरण : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (दि. 19) पनवेल, उरणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त नवीन पनवेल येथील अभिषेक कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून शिवरायांना एका वेगळ्याप्रकारे मानवंदना देण्यात आली. या रक्तदान शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत, नगरसेवक मनोज भुजबळ यांनी भेट दिली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.