अलिबाग : प्रतिनिधी
मागील आठवड्यात आलेल्या उधाणाच्या लाटांच्या मार्यामुळे अलिबाग समुद्र किनार्यावरील बंधारा उखडला गेला आहे. या बंधार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किनार्यावरील सेल्फी पॉईंटदेखील मोडला आहे. तीन दिवसांपासून समुद्राला मोठी भरती आली. उधाणाच्या भरतीचा अलिबाग किनारपट्टीवरील भागाला तडाखा बसला. भरतीच्यावेळी महाकाय लाटा किनार्यावर धडकत होत्या. ज्यामुळे अलिबाग समुद्र किनार्यावरील बंधार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समुद्र किनार्यावरील पर्यटकांचे आकर्षण असलेला अलिबाग बीच या अक्षरांचा सेल्फी पॉईंटदेखील लाटांच्या तडाख्याने उखडला गेला. बंधार्यावर बसविण्यात आलेल्या फरश्या लाटांच्या मार्यामुळे उखडून गेल्या. बंधार्याच्या रॅम्पची वाताहत झाली आहे. दरम्यान, उखडलेल्या बंधार्याची पहाणी करण्यात आली. अलिबाग बीच अक्षरांची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. नगरपालिकेकडून बंधार्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.