Breaking News

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर  रामशेठ ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्याची निवड

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील माहिती व तंत्र विभागातील द्वितीय वर्षाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतीक शर्मा याची खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आव्हान 2022 प्रथम निवडफेरीमध्ये निवड झाली आहे. पुढील फेरीसाठी तो पात्र ठरला आहे तसेच पुढील आव्हान कॅम्प कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे 19 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या शिबिरामध्ये सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापना विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्याचा फायदा सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी प्रतीक शर्माला पुढच्या फेरीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर, प्रा. डॉ. महादेव चव्हाण प्रा. कावेरी घोगरे, प्रा. भाग्यश्री शुक्ला, प्रा. तनुजा सुमन,  प्रा. राजश्री म्हात्रे, प्रा. प्रतीक्षा पाटील या सर्वांनी मार्गदर्शन केले व पुढील फेरीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे या सर्वांनी प्रतीक शर्माचे कौतुक केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply