Breaking News

वीज ग्राहकांच्या समस्या सोडवा

आगरी समाजाच्या शिष्टमंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे

पेण : प्रतिनिधी

वीज ग्राहकांच्या विविध समस्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.दर महिन्याचे वीज बिल हे ग्राहकांच्या हाती भरणा तारखेनंतर दिले जात असल्याने ग्राहकांना अकारण विलंब आकाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे, अनेकदा रिडींग न घेताच सरासरी बिल दिले जात असल्याने ग्राहकांना जादा बिलाची रक्कम कमी करणेसाठी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत, डीपी उघड्या अवस्थेत राहत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याची बाबही सूर्यकांत पाटील यांनी या वेळी अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली.  सडलेले पोल, गांजलेल्या तारा यामुळे खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याने ग्राहकांना होणारा त्रास, वीजबिल भरणा केंद्र वाढवून ग्राहकांची सोय करण्यात यावी. आणि तक्रार नोंदविण्यासाठी नेमलेल्या कर्मचार्‍याकडून फोन उचलण्यात होणारी कुचराई यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडविण्याची शक्यता असते. या आणि अशा अनेक मुद्यांवर यावेळी अधीक्षक आभियंत्यांशी चर्चा करण्यात आली. हे सर्व मुद्दे सार्वजनिक हिताचे आणि सर्वसामान्य ग्राहकांशी निगडित असल्याने त्यांचे तात्काळ निराकरण केले जाईल, असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांची शिष्टमंडळास दिले.  या शिष्टमंडळात संस्थेचे खजिनदार पी. वाय. पाटील, उपाध्यक्षा मीनाक्षी पाटील, अशोक म्हात्रे, ओंकार पाटील, रवींद्र म्हात्रे, राजेंद्र वाघ, कल्पना टेमकर, लवेंद्र मोकल, गणेश पाटील यांचा समावेश होता. या वेळी वीज वितरण कंपनीचे बिलींग मॅनेजर बोरसे व पत्रकार उपस्थित होते.

भाताची लावणी ठराविक दिवसात पूर्ण करावी लागते, नाही तर शेतीवर रोगराई पसरते. जून अखेर आणि जुलै च्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला असून भाताच्या लावणीची कामे आता वेगाने सुरु आहेत.

-एकनाथ धुळे, शेतकरी, कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply