Breaking News

माथेरानमध्ये मंगळवारी महास्वच्छता अभियान

श्री सदस्य करणार शार्लोट तलावाची स्वच्छता

कर्जत : बातमीदार

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून मंगळवार (दि. 26) पासून माथेरानमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात माथेरान शहर आणि कर्जत तालुक्यातील हजारो श्री सदस्य सहभागी होणार असून, ते शार्लोट तलावामधील गाळ काढणार असून परिसराची स्वच्छता करणार आहेत.

पावसाच्या पाण्याबरोबर जंगलातील गाळ आणि माती तसेच पालापाचोळा वाहून येऊन शार्लोट तलावाची साठवण क्षमता कमी होत आहे. या तलावातील गाळ काढल्यास माथेरानकरांना आणि पर्यटकाना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे.  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शार्लोट तलाव आणि परिसरात हजारो श्री सदस्य 26 जुलैपासून चार दिवस महास्वच्छता अभियान राबविणार आहेत. या कामासाठी माथेरान नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती प्रशासक आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply