Breaking News

पावसामुळे पालेभाज्यांची नासाडी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गेले काही दिवस राज्यभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. त्यात पावसामुळे एकूण आवक होत असलेल्या शेतमालातील 30 टक्के माल खराब निघत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वाढत आहे.

घाऊक बाजारातच भाज्या 50 ते 100 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत.एपीएमसीतील घाऊक भाजीपाला बाजारात फरसबीचे प्रतिकिलोचे दर 120 रुपये किलोपर्यंत गेले असून भेंडी 80 रुपये तल गवारीला 90 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

राज्यभरात गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. राज्याबरोबर परराज्यातून होणारी आवकही कमी होत आहे.

वाशीतील एपीएमसीतील भाजीपाला बाजारात मागील आठवड्यात सहाशेहून अधिक गाड्या भाजीपाला आवक होत होती. या आठवड्यात 400 ते 500 गाड्या आवक होत आहे. त्यात पावसामुळे भाजीपाला बाजारात येईपर्यंत खराब होत आहे. आवक होत असलेल्या शेतमालापैकी 30 टक्के मालाची नासाडी होत आहे. त्यामुळे मागणी तेवढा पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. भेंडी, गवार, फरसबी, वांगी आणि पालेभाज्या यांचे दर वाढले आहेत.

भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यात आवकही कमी आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील दोन महिने दर चढेच राहणार आहेत.

-नाना बोरकर, भाजीपाला व्यापारी

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply