Breaking News

खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात ‘विश्व हिंदी दिवस’

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञाान महाविद्यालयातील कर्मचारी कल्याण  विभागाच्या वतीने विश्व हिंदी दिवसानिमित्त सोमवारी (दि.10) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जे. एस. एम महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक कॅप्टन डॉ. मोहसिंग खान यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या कर्मचारी कल्याण विभागाच्या प्रा. करिश्मा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. प्रियंका पांडे यांनी स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि प्रा. करिश्मा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा. सुकन्या ठोबरे, प्रा. सफिना मुकादम, प्रा. रेवान शिंदे यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply