Breaking News

मोर्चेकर्यांना मुंबईत नो एण्ट्री

खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून चौकशी

खालापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होत नसल्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी आधिवेशनादरम्यान राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईत पोहचू नयेत यासाठी पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी व चौकशी सुरू केली आहे.

मराठा आरक्षण अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असून गोरगरीब विद्यार्थी मोठ्या आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सोमवार (दि. 14)पासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा, पुणे येथून येणार्‍या कार्यकर्र्‍यांना अडविण्याचे आदेश मिळताच पोलिसांनी चौक आणि खालापूर टोल नाक्यावर चारचाकी वाहनांंची चौकशी व तपासणी सुरू केली आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आढळल्यास त्यांना माघारी जाण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत.

खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक सतीश अस्वर, उपनिरीक्षक शेखर लव्हे, अंबिका अंधारे यांचे पथक तसेच वाहतूक पोलीस मागील दोन दिवसांपासून खालापूर व चौक टोल नाका येथे वाहन तपासणी व कार्यकर्त्यांची चौकशी करीत असून, वाहन क्रमांकांची नोंद केली जात आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply