पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांना अपमानित करून व त्यांना अश्लिल शिवीगाळ केल्यापकरणी आरोपींविरूद्ध कारवाई करण्याबाबत निवेदन एकनाथ शिंदे समर्थक रामदास शेवाळे यांनी कामोठे पोलिसांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आरोपी ललित सोडेवाल, गणेश खांडगे व इतरांनी कामोठे येथे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रतिमेस काळे फासले. त्यानंतर जमावाने मुख्यमंत्री व खासदारांना अश्लील शिवीगाळ करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. संविधानाने स्वत:चा नेता निवडण्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहे, तरीसुद्वा अनेक समाजकंटक हे आमच्याविरुद्धसुद्धा बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमांवर वर प्रसारीत करीत आहेत. त्यामुळे या आरोपींविरूद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.