पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोमटणेच्या वतीने आयोजित किल्ले व रांगोळी स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. दरम्यान, शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – सोमटणे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही झाले. या उपक्रमासाठी सोमाटणे गावातील ग्रामस्थांनी व मंडळाच्या सदस्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले होते. रांगोळी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन प्रसिद्ध चित्रकार व रांगोळी कलाकार रोशन पाटील, रवींद्र चौधरी, सुरेश पाटील हे उपस्थित होते. किल्ले स्पर्धेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पनवेलचे धारकरी विक्रम पाटील, माजी सैनिक उद्य भोसले, अविनाश पाटील, दीपक भोसले हे उपस्थित होते. दोन्ही स्पर्धांच्या वेळी तसेच पद्माकर पाटील, सुशांत पाटील, जितेंद्र दिघे, चेतन पोपेटा, मंदार पाटील, प्रसाद मुंडे, भूषण तोंडे, राकेश दिघे, रूपाली भोपी, प्रतिभा प्रकाश मुंडे ग्रामस्थ उपस्थित होते. किल्ले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री वकांडा वाँरियर्स ग्रुप सोमटणे (राजगड किल्ला), द्वितीय क्रमांक पाटील परिवार सोमटणे (खंदेरी किल्ला), तृतीय क्रमांक मुंढे युवा प्रतिष्ठान सोमटणे (पद्मदुर्ग किल्ला), चतुर्थ क्रमांक तन्मय दिनेश कुरंगळी व तन्वेष दिनेश कुरंगळी (प्रतापगड किल्ला), पंचम क्रमांक जय सुनील बैकर (राजगड किल्ला). यासोबतच रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अष्टविनायक महिला बचत गट, द्वितीय क्रमांक साईकृपा महिला बचत गट, तृत्रीय क्रमांक प्रतिक्षा संतोष पाटील आले आहेत.