तहसीलदारांना मागणीचे निवेदन
पाली : प्रतिनिधी
समस्त सुधागडमधील हिंदू बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) पालीमध्ये हिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. या रॅलीत सुधागडसह पेण, रोहा तालुक्यातील हिंदू बांधव, विशेषतः युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी धंनजय गद्रे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले.हिंदू बांधवांच्या नाहक हत्या होत आहेत, हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना केली जात आहे, गोमातेची हत्या करण्यात येत आहेत, तसेच अनेक वनवासी, आदिवासी बांधवाना प्रलोभने दाखवून धर्मांतरणासाठी (धर्म बदली) प्रवृत्त केले जात आहे, हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी या निवेदनात करण्यात आली आहे.