पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणार्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा आधीच गुल झाली आहे. विकासाचा दृष्टिकोन घेऊन अनेक विकासाची कामे भाजपकडून झाली आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 13मधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महापालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कामोठे परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. भाजप महायुतीच्या नेतृत्वाखाली झालेल्या चौफेर विकासकामांमुळे महायुतीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजपने केलेल्या कामांची दखल मतदार घेत असून त्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथील मानसरोवर कॉम्प्लेक्स परिसरात प्रभाग क्रमांक 13मधील उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रभाग क्रमांक 13मधील महायुतीचे उमेदवार रवींद्र गणपत जोशी, विकास नारायण घरत, हेमलता रवी गोवारी आणि शिला भाऊ भगत यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला आणि महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारावेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, के.के. म्हात्रे, राजेश म्हात्रे, श्रावण घरत, रवी गोवारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Check Also
टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …
RamPrahar – The Panvel Daily Paper