Breaking News

पावात सापडली उंदरांची विष्ठा, नागोठणे शहरातील प्रकार

नागोठणे : प्रतिनिधी

येथील किंग बेकरीमधील पावामध्ये गुरुवारी (दि. 4) उंदरांची विष्ठा (लेंड्या) सापडली असून, पेण येथील अन्न व औषध प्रशासनाने सदर बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाली-कुंभारशेत येथील सचिन डोबले हे गुरुवारी एका हॉटेलमध्ये भाजीपावच्या पार्सलची ऑर्डर केली. या पार्सलमधील पावामध्ये डोबले यांना काहीतरी काळे दिसले. ते निरखून पाहिल्यानंतर ती उंदरांची लेंडी असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत हॉटेल मालकाला विचारणा केली असता, त्याने सदरील पाव फेरीवाल्या मार्फत किंग बेकरीमधून आणल्याचे सांगितले. डोबले यांनी सदरील घटनेची नागोठणे पोलीस ठाणे आणि  ग्रामपंचायत तसेच पेण येथील अन्न व औषध प्रशासनाकडे रीतसर तक्रार केली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सचिन आढाव व विक्रम निकम हे आपल्या सहकार्यांसह बेकरीमध्ये तात्काळ दाखल झाले. त्यांनी पंचासह सदरील ठिकाणची पाहणी केली. बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता व कायदा 2006मधील तरतूदींचे उल्लंघन होत असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ किंग बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले.

नागोठणे येथील किंग बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळून आली. तसेच अन्नसुरक्षा व मानवी कायदा 2006 मधील तरतुदींचे उल्लंघन केले असल्यामुळे बेकरी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

-सचिन आढाव, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन-पेण

किंग बेकरीमधील पावामध्ये उंदराची विष्ठा सापडल्याची तक्रार प्राप्त होताच बेकरीचे शेखजाद खुर्शिद अन्सारी व नूर सबा यांना सर्व परवाने, कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस दिली आहे.

-मोहन दिवकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत नागोठणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply