Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या तत्कालीन नगरसेविका व माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 16 येथील उद्यानामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध सुविधांचा तसेच हायमास्ट, रस्त्याचे करण्यात आलेल्या काँक्रिटीकरचे लोकार्पण व भुमीपूजन तसेच ई कार्डचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवले महापालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 16 येथील उद्यानात करण्यात येणार्‍या स्टेजच्या बांधकाम करण्यात येणार आहे, तसेच माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 16 येथील उद्यानामध्ये ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे तसेच विर्सजन घाटाजवळ उभारण्यात आलेल्या हायमास्टचे आणि आदिवासी वाडी परीसर ते एकविरा माता मंदिरापर्यत्तच्या काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले तसेच या वेळी ई कार्डचे वाटपही नागरिकांना करण्यात आले.

या विकासकामांच्या शुभारंभावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या माजी सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाजप महिलामोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, भाजप नेते कमलाकर घरत, किशोर मोरे, शैलेश पाटील, सरोज मोरे, शिवानी रावते, वैशाली पाटील, सोनाली कुदळे, वनिता गोरेगावकर, सुजाता पाटील, पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply