Breaking News

विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप

खारघर : प्रतिनिधी

कठीण परिस्थितीत व्यवसाय करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित बनविण्याचे स्वप्न पाहणार्‍या रिक्षा चालकांच्या मुलांचा दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खारघर शहरातील एकता रिक्षा संघटनेच्या वतीने दि.7 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्थायी समिती समितीचे माजी सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर व माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.

शहरातील एकता रिक्षा संघटना ही रिक्षाचालकांची संघटना आहे. जवळपास हजार रिक्षा चालकांचा समावेश या संघटनेत आहेत. या वेळी दोन्ही स्थायी समितीच्या माजी सभापतींनी रिक्षा चालकांचे व त्यांच्या पाल्यांचे कौतुक केले. अ‍ॅड. नरेश ठाकुर यांनी भविष्यात प्रशासकीय सेवेत उच्च पदावर बसण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले, तर प्रवीण पाटील यांनी आजच्या घडीला रिक्षाचालक आपल्या राज्याचा मुख्यमंत्री असल्याने स्वतःला कमी न लेखात आपण रिक्षा चालकांची मुले आहोत हे अभिमानाने सांगा असे प्रवीण पाटील यांनी सांगितले.

समाजात एवढे मोठे व्हा की, अभिमानाने आपल्या पालकांची नावे समाजात घेतली जातील. या वेळी जवळपास 60पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला. विद्यार्थ्यांना मानधन, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या वेळी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आगरी कोळी रिक्षा महासंघाचे प्रसन्न कडू, राजेश पाटील, श्रीनिवास पाटील, विकास सूर्यवंशी तसेच कोंकण विभाग रिक्षा महासंघाचे प्रणव पेणकर, राजु राऊत, एकनाथ पिंगळे व एकता रिक्षा संघटनेचे कमलाकर ठाकूर, किसन म्हात्रे, उत्तम तांबडे, मेघनाथ म्हात्रे, गुरुनाथ पाटील, जयेंद्र कोळी, प्रवीण म्हात्रे, नितीन भगत आदींसह मोठ्या एकता रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply