Tuesday , February 7 2023

चांगू काना ठाकूर महाविद्यालयात विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालय आणि महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 6) सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावरच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

 या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे  आणि उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, महिला विकास कक्षाच्या प्रमुख मा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला उपस्थित होत्या.

स्त्रीमुक्ती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने विवाहपूर्व समुपदेशन विषयावर कार्यशाळेत स्त्री-पुरुष समानता, जोडीदाराची निवड, वैवाहिक तडजोडी व लैंगिक शिक्षण अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी डॉ. वृषाली मगदुम, सुनील मोरे, चंद्रकांत सर्वगोड, अनिता पाटील, वृषाली जाधव उपस्थित होत्या. या कार्यशाळेत 90 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होते. पायल गुप्ता आणि सागर मोरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी सर्वांचे मनापासून कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला विकास कक्षाच्या सदस्या पूजा धांडगे, ज्योत्स्ना वाजेकर, नीलिमा घरत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नीलिमा तिदार यांनी केले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply