पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 8) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भरत दुबे (सी.आय.) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्या विषयी जनजागृती करण्यासाठी भरत दुबे यांनी मार्गदर्शन केले, तसेच माजी उपमहापौर चारुशीला घरत, यशवंत कुमार तिवारी, ठाकूर सिंग, संस्थेचे सहसचिव भाऊसाहेब थोरात या सर्वांनी रॅलीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थ्यांच्या सहभागाने, बँड पथकाच्या सुंदर तालावरती हर घर जल उत्सव, स्वच्छ सागर सुरक्षित सागर, स्वच्छ किनारा सुरक्षित समुद्र, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत नवीन पनवेलच्या परिसरात अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात या सुंदर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, इंग्रजी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यमिक प्रभारी मुख्याध्यापक कैलास सत्रे, उच्च माध्यमिक कला विभाग पर्यवेक्षक अजित सोनवणे, वाणिज्य व विज्ञान विभाग पर्यवेक्षक प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक विभाग पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, इंग्रजी पूर्व प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका संध्या अय्यर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांच्या उपस्थितीने व सहकार्याने ही रॅली यशस्वीरित्या झाली.