उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी, मुंबई विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या 55व्या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये रायगड जिल्हा उत्तर विभागाच्या प्राथमिक फेरीच्या विविध स्पर्धामध्ये यश संपादन केले. यात पाश्चिमात्य वादन प्रथम क्रमांक विश्वकर्मा रूपेश, कथाकथन हिंदी तृत्तीय दिपीका सोनी, एकपात्री अभिनय हिंदी प्रथम भूमिका म्हात्रे, शास्त्रीय वादन द्वितीय निशांत कोळी, एकांकिका मराठी प्रथम हर्शद मुकादम, पृथ्वीराज रेबिले, यश वाघमारे, कल्याणी म्हात्रे, सिध्दांत म्हात्रे, भूमिका म्हात्रे, षिवम कोळी, कल्पेष कोळी, आदिती पाटील तर लोकनृत्य तृत्तीय निषांत कोळी, मेजर करूणा, साक्षी गोथल, सोनम कोळी, ईशा पाटील, सायली बोबले, परीक्षा शिगवन, मानसी धोत्रे, प्रगती सुपे, सावित्री शुक्ला आदी विद्यार्थ्यांनी वरील विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून यश मिळवले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड, प्रा. के. ए. शामा, प्रा. डॉ. पराग कारूळकर, प्रा. एम. जी. लोणे, प्रा. रियाज पठाण, प्रा. हन्नत शेख आदिनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.