Breaking News

आराव ग्रामपंचायतीतील तरुणांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

शेकापला खिंडार

पेण ः प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे पेण तालुक्यात जोराने वाहू लागल्याने भाजपमध्ये इनकमिंग करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाजपने पेण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच परिणाम म्हणजे सध्या रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पेणचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक विरोधी पक्षांतील कार्यकर्ते-पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यानुसार शनिवारी (दि. 8) पेण पूर्व विभागातील आराव ग्रामपंचायत हद्दीतील आरावच्या तरुणांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने येथे शेकापला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वावोशी येथील हरिओम कार्यालय या ठिकाणी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी माजी आमदार देवेंद्र साटम, कर्जतचे वसंतशेठ भोईर, भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शेकापला रामराम ठोकून कल्पेश सकपाळ, अविनाश भोसले, सूरज भोसले, अमर भोसले, रोहित भोसले यांसह आराव गावातील इतर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापच्या होमपीचवर झालेल्या पक्षप्रवेशाची ही सुरुवात असून यापुढेही अनेक इच्छुक कार्यकर्ते भाजपच्या तंबूत दाखल होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेकापसाठी ही धोक्याची घंटा असून, आता त्यांना कार्यकर्त्यांना आवरणे कठीण जाणार असल्याची

परिस्थिती निर्माण झाली आहे.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply