रोम ः वृत्तसंस्था
राफेल नदालने क्ले कोर्टवर प्रदीर्घ व संघर्षपूर्ण लढतीत आपली क्षमता सिद्ध करताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळविला आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
आपला 35वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नदालने 22 वर्षीय डेनिस शापोवलोव्हविरुद्ध शानदार पुनरागमन करताना 3-6, 6-4, 7-6(3) विजय मिळवला. नदाल पहिला सेट गमाविल्यानंतर दुसर्या सेटमध्ये 3-0ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने तिसर्या सेटमध्ये 6-5च्या स्कोअरवर दोन मॅच पॉइंट वाचविले.
रोममध्ये नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणार्या नदालची यानंतरची लढत अलेक्सांद्र ज्वेरेवविरुद्ध होईल. ज्वेरेवने येथे 2017मध्ये जेतेपद पटकावले होते. गेल्या आठवड्यात माद्रिद ओपनचे जेतेपद पटकावणार्या ज्वेरेवने शानदार पुनरागमन करताना केई निशिकोरीची झुंज 4-6, 6-3, 6-4 ने मोडून काढली. त्याआधी अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने क्वालिफायर अलेजांद्रो डेविडोविच फोकिनाचा 6-2, 6-1ने सहज पराभव केला.
महिला विभागात अव्वल मानांकित एश बार्टीने वेरोनिका कुदेरमोतोव्हाचा 6-3, 6-3ने पराभव केला. तिला पुढच्या फेरीत अमेरिकेच्या कोको गॉच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. गॉने आर्यनाने सबालेंकाचा 7-5, 6-3ने पराभव केला.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …