Breaking News

नवी मुंबईत मोबाइल चोरांचे त्रिकूट अटकेत

एक लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल : वार्ताहर

रस्त्यावरून मोबाइलवर बोलत जाणार्‍याच्या हातातली मोबाइल हिसकावून पळ काढणार्‍या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पथकाला यश आले आहे. या मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केली आहे. या तीन आरोपीकडून एक लाख 33 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या तीन जणांच्या टोळीने नवी मुंबई परिसरातील नेरूळ, एपीएमसी, वाशी, तुर्भ आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरी केल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई शहरात मोबाइल स्नॅचिंग करून मोबाइलची चोरी करणार्‍याच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. या वाढत्या चोरीवर आळा घालण्यासाठी विषेश मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार अश्या मोबाइल चोराचा शोध घेण्यास पोलिसांकडून सुरुवात करण्यात आली होती. या मोहिमेंर्तगत काम करताना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, दोन व्यक्ती कोपरखैरणे डी मार्टजवळ मोबाइलची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मंगेश वाट, किरण राऊत, शशिकांत शेडगे, नितीन जगताप, राहुल वाघ, आणि अन्य पोलिसांनी कोपरखैरणे डी मार्ट परिसरात सापळा रचला होता, सापळा लावल्यानंतर काही अज्ञात व्यक्ती या परिसरात  संशय रित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. या संशयितांची चैकशी केल्यानंतर, हे अज्ञात व्यक्ती उडवा उडवीचे उत्तर देऊ लागले होते. त्यामुळे या व्यक्तींवरील संशय अधिक बळावल्यानंतर आरोपीचा संशय अधिक बळावला आणि अधिक चौकशी केली असता या आरोपी कडून मोबाइल आढळून आले. अधिक चौकशी केली असता हे मोबाइल चोरीचे असल्याचे आरोपीने कबूल केले आहे. आकाश कांबळे (वय 22, रा. कोपखैरणे), सिद्धेश शौर्य (वय 26, रा. कोपरखैरणे) आणि इम्रान शेख (रा. सीवूड्स, नेरूळ) अशी पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. या आरोपीकडून जवळपास एक लाख 33 हजाराचा ऐवज आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये मोबाइल आणि दुचाकीचा समावेश आहे. हे आरोपी रस्त्यावरून मोबाइल वर बोलत चालणार्‍या चाकरमान्यांच्या हातातील मोबाइल चोरून फरार होत होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply