मोहोपाडा : प्रतिनिधी
रायगड जिल्हा आणि पनवेल शहर जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्या जिल्हास्तर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पनवेल जम्प रोप असोसिएशनच्या अध्यक्षा स्मिता पनवेलकर व सचिव प्रतिक कारंडे यांनी नवीन पनवेल येथे केले होते. या स्पर्धेत रसायनीतील स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण 180 खेळाडू सहभागी झाले होते. यात निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूकापूर शाखेने वर्षी प्रथम विजेतेपद तर प्रशांत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्ली शाखेने द्वितीय पारितोषिक, मनीष पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल संघाने तृतीय पारितोषिक आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी संघाने चतुर्थ पारितोषिक पटकावले.
यात रसायनी येथील संजय काशिनाथ पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी चार सुवर्णपदक, दोन रौप्य व दोन कांस्यपदक पटकावले. यात विनायक पाटील, भावार्थ धुमाळ, अनुसया कदम व कादंबरी चौधरी यांनी सुवर्ण, ऋषभ मोरे व आर्यन दिलोड यांनी रौप्य व स्वरूप पाटील, ज्ञानेश्वर कदम यांनी कांस्यपदक पटकावले.
सर्व विजेत्या स्पर्धकांची 27 व 28 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे होणार्या राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या वेळी युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …