पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव 2022करीता गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी जाहीर केले आहे.
सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गणोशोत्स्व शुल्क माफ करावे, अशी मागणी गणेश मंडळांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नोंदणी शुल्क माफ करण्याचे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी मंडप परवानगी शुल्क, नोंदणी शुल्क व अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवानगी देणार आहे. यासाठी http://smartpmc.in/Login ही वेबसाईट तयार केली असून, गणेश मंडळांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे, तसेच महापालिकेच्या वतीने हा परवाना मिळण्यासाठी एक खिडकी योजनेअतंर्गत अग्निशमन ना हरकत दाखला, वाहतुक ना हरकत दाखला व महानगरपालिकेची मंडप उभारण्याबाबतची परवानगी मिळणार आहे.
इथे करा संपर्क
गणेश मंडळांनी अधिक माहितीसाठी महापालिकेच्या 1800-227-701 या टोल फ्री क्रमांक संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी panvel corporationgmail.com ई-मेल, दुरध्वनी क्रमांक ः 022-27458040/41/42, व्हॉट्सअॅप क्रमांक व एसएमएस सुविधेसाठी 9769012012 हे क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …