अलिबाग : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक,पुणे, नंदुरबार व रायगड येथून जवळजवळ 42 जणांनी सहभाग घेतला. या सेमिनारद्वारे हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगाचा संदेश देण्यात आला. या सेमिनारचे उद्घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी केले. या सेमिनारमध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंगचे अध्यक्ष सुरेश कोळी, सागर कोळी, संदीप माने यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक तसेच पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. हा संपूर्ण सेमिनार रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper