धाटाव : प्रतिनिधी
हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत रोह्यात दक्षिण रायगड भारतीय जना युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 10) बाईक रॅली काढण्यात आली होती. रोहा शहर ते कोलाड नाका या परिसरात फिरून या रॅलीतील युवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत जनजागृती केली.
सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर, राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा रोहा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेश डाके, डान्स क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे अध्यक्ष अनिल शेलार यांनी या बाईक रॅलीचे आयोजन केले होते. रोहा शहरातील राम मारुती चौक येथील परमपुज्य पाडुरंगशास्त्री आठवले, स्वातंत्र्यविर सावकर, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामराव देशमुख यांना पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. राम मारुती चौक येथून तीनबत्ती नाका, एसटी बस स्थानक, नगर परिषद कार्यालय, दमखाडी, वरसे, एक्सेल स्टॉप, धाटाव, किल्ला, संभे मार्गे ही बाईक रॅली कोलाड नाक्यावर आली. तेथे या रॅलीची सागंता करण्यात आली. रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम व अमर जवान तुझे सलाम अशा घोषणा देण्यात येत होत्या.
युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, रोहा तालुका सरचिटणीस अविनाश कान्हेकर, शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस श्रद्धा घाग, भाजपचे रोहा तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक सनील ईगावले, सरपंच रघुनाथ कोस्तेकर, शिवानी भांड, राजेश भगत, सागर डाके, धर्मा कोकरे, संकेत मोरे, दिप वायडेकर यांच्यासह भाजप व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बाईक रॅलीत सहभागी झाले होते.