Breaking News

अचंबित करणार्या प्रवासानंतर भारत ‘टेक ऑफ’च्या तयारीत!

अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यातहीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगावा,अशी दमदार वाटचाल भारताने केली आहे. सध्याच्या परिस्थितीचे देश म्हणून आकलन केले तर ही वाटचाल अचंबित करणारी आहे.

आपल्या देशाच्यास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्या मनात देशाच्या वाटचालीविषयीच्या काय भावना आहेत, यालाअतिशय महत्व आहे. आपण जेव्हा देशाविषयी बोलतो, तेव्हादेशात 75 वर्षे ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाहीत, याचापाढा वाचतो. गेल्या 75 वर्षांत खूप काही व्हायला पाहिजे होते, याविषयी दूमत असण्याचे कारण नाही. पण देशाच्या या वाटचालीकडे निव्वळ आर्थिक अंगाने पाहिले तर भारताने मोठी झेप घेतली आहे, हे लक्षात येते. भारतात एक देश म्हणून आणि भारतीय म्हणून आपल्या सर्वांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, मात्र त्या पूर्णपणे वापरल्या गेल्या पाहिजेत.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त त्या सर्व क्षमता यापुढे आम्ही वापरू असा संकल्प निश्चितच केला जाऊ शकतो.

प्रतिभेला स्थर्याची जोड

परवा एक बातमी प्रसिद्ध झाली.पंढरपूरलाएकेकाळीउसाची शेती करणारेवैष्णवीप्रसाद रानडे हे सध्याकल्याण येथे रेल्वे रेजिमेंटमध्ये अभियंता आहेत.उसाचा ट्रॅकटरचढावरत्याच्या ब्रेकवर उभे राहून चालकालानियंत्रित करावा लागत होता, हेत्यांनी पाहिले होते.त्यांनी हीअडचणलक्षात ठेवून संशोधन केले आणि अँटी रोल डाऊन मॅकनिझमसाठी पेटंट मिळविले. चढावर गाडी मागे जाणार नाही, असेतंत्र त्यांनी विकसित केले. असे पेटंट घेणारे पाश्चिमात्य संशोधकही स्पर्धेत होते. पणते टिकले नाहीत, कारणपाश्चिमात्य संशोधकांनीत्यासाठी सुमारे 100 सुटे भाग वापरले होते, तर रानडे यांनी केवळ सहा सुट्या भागात हे तंत्र विकसित केले होते. त्यामुळे रानडे यांना अखेर पेटंट मिळाले. ही बातमी महत्वाची यासाठी आहे की भारतीयांमध्ये असलेली प्रतिभा यातून दिसते. अलीकडच्या काळात भारतीय समाजही पोटापाण्याच्या प्रश्नांतून बाहेर पडला असून त्याला आपली प्रतिभा वापरण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होते आहे, याचे हे एक उदाहरण आहे.

ही अतिशोयोक्ती नव्हे

प्रतिभेला आर्थिक समृद्धीची जोड मिळाली तर देश मोठी झेप घेवू शकतो. त्यामुळे आर्थिक विकासात आपण कोठे आहोत, हे पाहणे या निमित्ताने फार महत्वाचे आहे. आपली आजची आर्थिक समृद्धी युरोप अमेरिकेपेक्षा कमी आहे, हे तर सर्व जण जाणतात, पण आपला प्रवास कोठून कोठे झाला आहे, हे जाणून घेतले तर आपल्याला या वाटचालीचा निश्चितच अभिमान वाटला पाहिजे. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जीआकडेवारी देशासमोरठेवली जाते, त्यातून अशा अनेक संदर्भातून अशी काही आकडेवारी एकत्र केली असता भारताची गेल्या 75 वर्षांतील झेप अचंबित करणारी आहे. यातील काही आकडे ते आपल्याला अतिशोयोक्ती केल्यासारखे वाटू शकतात. पण ती वस्तुस्थिती आहे. त्यातील काहीच आकड्यांचा येथे आपण विचार करू यात.

दुर्लक्ष करता येणार नाही, असे आकडे

भारतीयांचे 1950 मध्ये दर माणशी राष्ट्रीय उत्पन्न 265 रुपये रुपयेहोते, ते आज दीड लाख रुपये आहे. भारताचा जीडीपी 1960 मध्ये 0.04 ट्रीलीयन डॉलर होता, जो आज 3.18 ट्रीलीयन डॉलर इतका आहे. महत्वाचे म्हणजे तो जगातील 192 देशांमध्ये पाचव्या क्रमांकाचा आहे. 1960 मध्ये जीडीपीच्या टक्केवारीत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वाटा 11.3 टक्के होता, तो 2015 मध्ये 55 टक्यांवर गेला होता. सध्या तो 40 टक्के आहे. 1951 ला रेल्वेने 40 लाख प्रवासी प्रवास करत होते, आज2.3 कोटी नागरिक रेल्वे प्रवास करतात. भारतातील रेल्वे नेटवर्क जगातील चौथ्या क्रमाकांचे तर रोड नेटवर्क दुसर्‍या क्रमांकाचेआहे. 1951 मध्ये मोटारींची संख्या 30 हजार होती, ती आज 30 कोटी झाली आहे.1995 मध्ये विमान प्रवास करणार्‍यांची संख्या 37 लाख होती, ती 2018 मध्ये 3.50 कोटी झाली आहे. 1951मध्ये 4.8 दशलक्ष टन अन्नधान्याची आयात करावी लागत होती, तर 2020 मध्ये आपण 5.9 दशलक्ष टन अन्नधान्याची निर्यात केली आहे. दूध आणि साखर उत्पादनात जगात पहिला क्रमांक तर गहू आणि तांदूळ उत्पादनात आपण दुसर्‍याक्रमांकावर आहोत. 1951 मध्ये सरासरी आयुष्यमान केवळ 37 वर्षे होते तर आता ते 70 वर्षे झाले आहे. साक्षरतेचे प्रमाण 1951 मध्ये 18.3 होते, जेआज 77.7 टक्के झाले आहे. याकाळात आपली लोकसंख्या दुप्पट झाली. असे असताना ही कामगिरी आपण केलेली आहे.

लोकशाहीचे रक्षण

भारत हा सध्या टेक ऑफ स्टेजमध्ये आहे, असे का म्हटले जाते, हेही जाणून घेतले पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक महत्वाचा मानला गेलेला घटक म्हणजेतरुणांची संख्या. ती 55 कोटींच्या घरात आहे. माहिती तंत्रज्ञानात तरुण करतअसलेल्या कामगिरीमुळे जगाची बाजारपेठ भारताला मिळते आहे. जगाने स्वीकारलेल्या इंग्रजी भाषेत पारंगत तरुण भारतात सर्वाधिक आहेत. चीन जगात वादग्रस्त ठरत असल्याने भारतातील उत्पादनांची मागणी जगभर वाढू लागली असून गेल्या वर्षी निर्यातीचा उच्चांक हा त्याचाच पुरावा म्हटला पाहिजे. कोरोनामधून तुलनेने लवकर करून घेतलेली सुटका आणि अर्थव्यवस्थेने घेतलेला वेग, यामुळेभारताच्याअर्थकारणाला जगात अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यात भारतीयांनी केलेले लोकशाहीचे रक्षण ही तर भारताची अमूल्य अशी कमाई आहे.

लोकसंख्येची घनता अधिक असूनही

काही आणखी आर्थिक निकष पाहू यात. भांडवली बाजाराला (शेअरबाजार) जगात अतिशय महत्व आले आहे. भारताचा भांडवली बाजार आज 321 अब्ज डॉलरवर पोचला आहे आणि पाच हजार 215 कंपन्या म्हणजे जगात सर्वाधिक कंपन्या लिस्ट झालेल्या आहेत.सध्या ग्रीन एनर्जीचा बोलबाला आहे. त्यासाठीच्या उभारणीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठे सोलर एनर्जी पार्क (14 हजार एकर) राजस्थानात भादला येथे उभे राहिले आहे. जगातील साडेतीन टक्के पर्चेसिंग पॉवर बाळगून असलेला आपला देश आहे. परकीय चलनाचा साठा 600 अब्ज डॉलरच्या घरात असून तो जगात चौथ्या क्रमांकाचा आहे. सोने घराघरात इतके असावे का, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी आज 21000 टन सोनेआपल्याकडे आहे.अशी ही आकडेवारी सांगते की गेल्या 75 वर्षांमध्ये आपण मोठी मजल मारली आहे. त्याचा आणखी एक महत्वाचा पैलू आपल्याला विसरता येणार नाही. ती आपली 140 कोटी लोकसंख्या आणि तिची घनता. आपला देश जगात सातव्या क्रमांकाचा मोठा असला तरी प्रति चौरस किलोमीटरला भारतात 425 लोक रहातात. लोकसंख्येची ही घनता अधिक मानली जाते. कारण आपण आपली ज्या प्रगत देशांशी तुलना करतो अशा अमेरिकेची 33, रशिया 9, चीन 145, ऑस्ट्रेलिया 9 अशी आपल्यापेक्षा खूपच कमी घनता आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा प्रवास निश्चितच अभिमानास्पद आहे.

-यमाजी मालकर, अर्थप्रहर

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply