पनवेल : प्रतिनिधी
गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘ग्लोबल कप 2019’ स्पर्धेत विहिघर येथील आर्य अतुल भोईर याने चमकदार कामगिरी केली आहे.
गोवा येथील ग्लोबल स्कूल ऑफ स्पोर्ट्सच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर ज्युनिअर गटाची ़फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील तमिळनाडू, गोवा, केरळ, बंगळुरू, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आदी राज्यांतील 60 संघांचा सहभाग होता. आर्यच्या वेनम ़फुटबॉल स्पोर्ट्स अकादमी या संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संघाने मिळविल्या यशात आर्यचा मौलिक वाटा असून त्याने केलेल्या कामगिरीबद्दल अनेक मान्यवर, खेळाडू, तसेच त्याचे आजोबा पंढरीनाथ फडके, वडील अतुल भोईर, आई रेश्मा भोईर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. आर्य भोईरचे या कामगिरीबद्दल सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.