नवी मुंबई एपीएमसीत आवक वाढल्याने दरात घसरण
नवी मुंबई : प्रतिनिधी
येथील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गेल्या महिनाभरात चढे असलेले भाजीपाल्याचे दर आता उतरण्यास सुरवात झाली आहे. आवक वाढू लागल्याने भाज्यांचे भाव 40 ते 50 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.
अनलॉक सुरू झाल्याने एपीएमसीमध्ये महाराष्ट्राबरोबरा परराज्यांतूनही भाजीपाला येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सरासरी प्रत्येक भाजीचे होलसेलमधील दर 20 ते 30 रूपये किलो, तर किरकोळ मार्केटमधील दर 40 ते 60 रुपये किलोवर आले आहेत. 500 गाड्यांची असलेली आवक गेल्या चार दिवसांपासून 600च्या वर पोहचली आहे.
दुसरीकडे कांद्याचे दर मात्र म्हणावे तसे खाली आलेले नाहीत. कांदा 70 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे.