कर्जत : राष्ट्रीय ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कर्जतचे खेळाडु रोहिणी मोडक आणि गणेश तोटे या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावून कर्जत तालुक्याची मान उंचावली. हे दोन्ही सुवर्ण पदक विजेते खेळाडू कर्जत शहरातील संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू आहेत.
राष्ट्रीय सब ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पॉवर लिफ्टिंग ऑफ इंडिया व केरळ स्टेट पॉवर लिफ्टिंग असोसिएशन केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान टाऊन हॉल कासार गोड केरळ या ठिकाणी घेण्यात आली. या स्पर्धेत संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमी कर्जत मधील तीन खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सब ज्युनिअर स्पर्धेत कोमल पवार हिने 158.5 किलो वजन उचलून पाचवा क्रमांक प्राप्त केला. तर ज्युनिअर मुलींच्या गटात 43 किलो वजनी गटात रोहिणी मोडक हिने 207.5 किलो वजन उचलुन सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच ज्युनिअर मुलांमध्ये 105 किलो वजनी गटात गणेश तोटे यांनी 652.5 किलो वजन उचलुन सुवर्णपदक प्राप्त केले.
या स्पर्धेसाठी संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमी कर्जत तसेच सर्व खेळाडू यांचे कौतुक कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर संस्था यांच्याकडून करण्यात आले आहे. तर मार्गदर्शक कोच आणि राष्ट्रीय खेळाडू तसेच पंच एन डी दाभाडे यांचे देखील कौतुक होत आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …