Breaking News

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खालापूरच्या कुणाल पिंगळेला कांस्यपदक

खोपोली : प्रतिनिधी
पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडीवली गावचा रहिवासी आहे.
या यशाबद्दल कुणाल पिंगळेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुणालची जम्मू काश्मीरमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे.
भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी कुणालचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नसल्याने त्यांच्यामधील दडलेला खेळ जगासमोर प्रदर्शित होत नसतो, परंतु ग्रामीण भागात आजही असे खेळाडू आहेत, जे राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात. घोडीवली गावातील कुणाल पिंगळेने ते करून दाखवित यश मिळविले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply