खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधे मंगळवारी (दि.17) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाचा शेवटचा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चोचे अध्यक्ष विनोद घरत, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रभाकर जोशी, खारघर युवा मोर्चोचे खाजिनदार प्रमोद पाटील हे मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, उच्च माथ्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर, अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षच्या समन्वय प्रा. महेश्वरी झिरपे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये विविध देशभक्तीपर विषयावर नृत्य व नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात अतिथी देवेा भवो ने झाली. त्यानंतर सात्वित आहाराचे महत्व सांगत उपस्थितांना ‘सात्विक आहार देण्यात आले. यानंतर ‘मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ आणि दानधर्म करावा हा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर ‘जय जवान, जय किसान, ‘आय लव माय इंडिया’ जल्लोष स्वातंत्राचा ही शेवटची थीम होती.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल कांबळे यांनी केले. तसेच मिनल मांडवे, प्रा. मीरा पटेल, प्रा.राजश्री म्हात्रे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र संस्थेचे यांनी आयोजकांचे व विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेच उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. सिदेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.