Breaking News

शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानात अभूतपूर्व उत्साहात झाले. या वेळी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

या वेळी नगरसेवक मुकीद काझी आणि अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी सय्यद अकबर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका नाज हाफीज, मायनॅरिटी गर्ल्स स्कूल प्रेसिडेंट अझीम मुल्ला, माजीद कच्छी, निहाल हाफीज व सहकारी, नवीद पटेल, मतीन मास्टर, यासुन पटेल, जावीद पटेल, जुबेर मास्टर, समीर खांडे, आसिफ मुज्जावर, करीम पिंजारी, ईसा पिंजारी, प्रवीण प्ररमार, रियाझ पटेल, वसीम शेख, जाफर सैय्यद, युनुस शेख, नवीद मुल्ला, फयाझ शेख, समीर शेख, सगीर तांबुली, फैयझ रावत, अब्दुल पिंजारी, याकुब पिंजारी, रविश शेख, सद्दाम खान, कदीर खान, शरीफ शेख, रशीद शेख, मुस्ताक शेख, रसुल शेख, आझीम अन्सारी, इत्मियाज सुरेमे, नाझीश कच्छी, आफान पठाण, जमील पठाण, माईकल शेख, जावीद कच्छी, रझीम पटेल, हानीफ तांबुली, आलताफ पटेल, शोएब कुरेशी, अखलाख पटेल, फकीर खान, मलिक शेख, इशरार शेख, जावेद पावले, झाकीर शेख, शैहकाझ काझेल, अस्लम शेख, तन्वीर खान, इमरान तांबुली, रशीद शेख, अन्सार अन्सारी, रफीक शेख, फिरुझ शेख, मंजुर शेख, युसुफ शेख, चंद्रकांत कावले, अस्लम साईन, बाबुभाई साईन, इक्बाल कच्छी, हसन कच्छी, मुनीर सैय्यद, अस्लम शेख, मुकीम तेली, अझहार नावडेकर, शहिद शेख, इमरान अन्सारी, शहीद कच्छी, शिवराज धर्म, धानसर येथील शेकापचे माजी ग्रामपंचायत सदस्य काळुराम गोंधळी, तसेच खारघरमधील राष्ट्रवादीच्या अनिता शंकर सोनुले व सहकार्‍यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply