नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी सरकारने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या योजनेंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकणार आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासोबतच क्रेडिट लाइन हमी योजनेच्या निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या या पावलामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वीच सांगितले होते की, सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्या दृष्टीने आज निर्णय घेण्यात आला, असे मंत्री ठाकूर म्हणाले.
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या असून राज्यांच्या सहकार्याने हे काम प्रगतिपथावर आहे. शाश्वत उपाय शोधून शेतकर्यांना समृद्ध आणि शेतीचे आधुनिकीकरण कसे करता येईल यावर भर दिला जात आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …