Breaking News

कामोठ्यात विकासकामांचा शुभारंभ

माजी नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर हेमलता गोवारी यांच्या सिडकोकडे केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुराव्यामुळे पाथवे आणि पथदिवे तसेच नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधण्यात आली आहे. या विकासकामांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 18) झाले.

कामोठे शहरातील सेक्टर 13 आणि 14 येथील नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये पथदिवे व पाथवे संदर्भात होत असलेल्या समस्या पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यानुसार हेमलता गोवारी यांनी सिडकोकडे सातत्यापुर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर ठिकाणी पाथवे आणि पथदिवे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत, तसेच सेक्टर 35 येथील माँगोगार्डनमध्ये हेमलता गोवारी यांच्या नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधण्यात आली आहे. या विकासकामांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.

या विकासकामांच्या शुभारंभावेळी शरद जगताप, रवि गोवारी, युवानेते हैप्पी सिंग, रमेश तुपे, भाजप युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप नेते संदीप तुपे, नवनाथ भोसले,  प्रवीण कोरडे, जयकुमार डिगोळे, गोमेश म्हात्रे, हरिभाऊ सातपुते, कृष्णाजी टिके, आशितोष सोनावने, मयंक सिंग, सत्यम शर्मा, निविद जाधव, आदिनाथ मुंडे, गणेश शिरसेकर, उमेश, संतोष चव्हाण, नागेश टिके, यांच्यासह पदाधिकारी व ततसे काजल सोसायटी, चायना संगम सोसायटी, साईलीला सोसायटी, राम हेरिटिज, शिलालेख सोसायटी, कोहिनूर हेरिटिज, मारुती विला, शुभ कलश, कैलास टॉवर या सोसायट्यांमधील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्यसाधून माजी नगरसेविका डॉ. हेमलता गोवारी यांचा वाढदिवस केक कापून साजरा झाला.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सबका विश्वास संपादन करायचा असेल तर लोकांच्या हिताची कामे सातत्याने करत रहायला पाहिजे. तसे कार्य हेमलता गोवारी यांनी केले असून, नगरसेवक पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला तरीही नागरिकांची हिताची कामे हेमलता गोवारी यांच्या माध्यमातून सुरू आहेत, त्यामुळे त्यांचे आणि रवि गोवारी यांचे आभार मानले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply