पाली : प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने पाली येथे उभारलेली लाखमोलाची दहीहंडी फोडण्याचा मान वरवठणे येथील श्री चौडेश्वरी माता गोविंदा पथकांने पटकाविला. शुक्रवारी रात्री सात थर लावून या गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली.
सुधागड तालुक्यातील पालीमध्ये शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) व भाजप पुरस्कृत एक लाख 11 हजार 111 रुपये व आकर्षक चषक असलेली दहीहंडी उभारण्यात आली होती. आमदार रविशेठ पाटील व आमदार महेंद्र दळवी या ठिकाणी गोविंदा पथकाना शुभेच्छा दिल्या. उंच क्रेनला बांधलेली ही दहीहंडी कोण फोडणार? दहीहंडीची उंची कमी करावी लागेल का ? ही हंडी फोडण्यासाठी किती थर लावावे लागतील, याची उत्सुकता लागून राहिली होती. रायगड जिल्ह्यातून आलेल्या अनेक गोविंदा पथकांनी ही लाखमोलाची दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी वरवठणे येथील श्री चौडेश्वरी माता गोविंदा पथकांने सात थर लावून ही मानाची दहीहंडी फोडली.
शिवसेना (शिंदे गट) सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख, उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, तसेच भरत पाटील, सुभाष पाटील, सिराज पानसरे, किशोर म्हात्रे, राजेंद्र गांधी, संतोष लाड, प्रशांत शेठ, प्रकाश ठोंबरे, हिराकांत भगत, किशोर जोशी, शिरीष सकपाळ, अजय खंडागळे, शिवसेना (शिंदे गट) युवा सेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, संदीप दपके, मंगेश पालांडे, शिवराम पवार, सतीश देशमुख, धनंजय पांडव, मनोज भोईर, निखिल शहा, अविनाश शिंदे, संदेश सोनकर, मंगेश खंडागळे, उमेश मढवी, महेश खंडागळे, किरण खंडागळे, ललित ठोंबरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि दहीहंडी प्रेमी नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.