Breaking News

भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय

तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी

माउंट मांउगानुई ः वृत्तसंस्था

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 20) माउंट मांउगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने केलेल्रूज्ञ शतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले, मात्र हे लक्ष्य गाठण्यात न्यूझीलंडच्या नाकीनऊ आले आणि भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताची सुरुवात काही खास नव्हती. भारताची पहिली विकेट 36 धावांवर पडली, जेव्हा ऋषभ पंत 13 चेंडूत सहा धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशनने वेगवान धावा करत भारताची धावसंख्या 50च्या पुढे नेली, पण तोही 31 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. या सामन्यात पावसामुळे 27 मिनिटांचा खेळ वाया गेला, मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. एका टोकाला, सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली आणि वेगवान धावा केल्या, पण दुसर्‍या टोकाला विकेट पडत राहिल्या. श्रेयस अय्यरला नऊ चेंडूत 13 धावा केल्यावर विकेट पडली. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही. अखेरीस, सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 111 धावांची वादळी खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि सात षटकार मारले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने सहा गडी गमावून 191 धावा केल्या. 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. विस्फोटक फिन ऍलन खाते न उघडताच बाद झाला. सामन्याच्या दुसर्‍या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याला अर्शदीप सिंगकडे झेलबाद केले. 56 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली आहे. वॉशिंग्टन सुंदरने डेव्हन कॉनवेला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. युझवेंद्र चहलने ग्लेन फिलिप्सला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. दीपक हुड्डाने डॅरिल मिशेलला झेलबाद केले. युझवेंद्र चहलने डावाच्या 14व्या षटकात जेम्स नीशमला बाद केले आणि किवी संघाचा निम्मा संघ बाद झाला.  16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने मिचेल सँटनरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 126 धावात संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक 61 धावा केल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply