Breaking News

माय इकोफ्रेंडली बाप्पा!

पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेस शनिवारी (दि. 31) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माय इकोफ्रेंडली बाप्पा, या शीर्षकाखाली भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीतील श्रीगणेश मंदिर सभागृहात झालेल्या कार्यशाळेत अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांना पर्यावरणपूरक गणपती बसविण्यास या वेळी शिकविण्यात आले.

या कार्यशाळेला सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, उद्योजक राजू गुप्ते, अ‍ॅड. दीपाली बांद्रे, इंदूमती ठक्कर, अर्चना ठाकूर, स्वप्निल ठाकूर, मयुरेश नेतकर, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अभा जोशी, पवित्रा शेरावत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply