अभिनेता सुनील शेट्टीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावाजवळ बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीच्या उपस्थितीत मड स्कलच्या दोन दिवसीय तिसर्या सीझनला सुरुवात झाली. शर्यतीच्या सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत सुनील शेट्टीने या शर्यतीत भाग घेतला होता. या वेळी अभिनेता सुनील शेट्टीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. गोविंद बन्सल यांच्या सिद्धेश्वर येथील जागेत ही ऑफ राईड स्पर्धा घेण्यात आली. मड स्कलच्या तिसर्या सीझनची सुरुवात मड स्कलचे संस्थापक सॅम खान, सुबोध सिंग आणि आशिष सिंग यांच्यासह सुनील शेट्टीने खुल्या कारमध्ये केली. यावेळी तब्बल 200हून अधिक स्पर्धक आपल्या विशेष गाड्या घेऊन या खेळात सहभागी झाले होते.