Breaking News

पराग बोरसेंच्या चित्र कार्यशाळेला सिंगापूरमध्ये लाभला उदंड प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी

सिंगापूर येथील माय आर्ट-स्पेस, ईस्ताना पार्क या प्रसिद्ध कलादालनामध्ये नुकतीच कर्जतचे विख्यात चित्रकार पराग बोरसे यांची व्यक्तिचित्रणाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दर दिवशी सहा तास या प्रमाणे तीन दिवस ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला भारतीय आणि सिंगापूरकर विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेदरम्यान पराग बोरसे यांनी सॉफ्ट-पेस्टल या माध्यमातून एक व्यक्तिचित्रण पूर्ण करून दाखवले. उपस्थित  विद्यार्थ्यांनीही बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यक्तिचित्रण पूर्ण केले. पिवळ्या रंगाचा फेटा घातलेल्या मेंढपाळाचे हे व्यक्तिचित्र होते. व्यक्तिचित्रण करताना अमूर्त आकारांचे महत्त्व या विषयावर  बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. पराग बोरसे यांच्या चित्राला पेस्टल जरनल अमेरिकेच्या मॅगझिनने व्यक्तिचित्रणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या चित्रांना परदेशातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच अनेक चित्रे परदेशातील ख्यातनाम मासिकांमध्ये प्रसिद्ध होऊन त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. बोरसे यांनी कर्जतमधील अनेक उदयोन्मुख चित्रकारांना मार्गदर्शन केले आहे. त्या चित्रकारांची चित्रेही सातासमुद्रापार गेली आहेत.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply