नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाची सांगता

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
सिबीडी येथील सुनिल गावस्कर मैदानात सलग 10 दिवस रंगलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-2023 चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी मराठी दौलत लाखाची या मराठी नृत्यगीत कार्यक्रमाने समाप्ती करण्यात आली. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या सभासद महिलांनी यावेळी नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. या महोत्सवात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल्स ,मोठमोठे पाळणे हे प्रमुख आकर्षण होते. हळदी -कुंकू समारंभ, मेहंदी व पाककला, आम्ही दोघे राजराणी यांसारख्या कार्यक्रमाचा आनंद महिलांनी लुटला, तर शेकडो विद्यार्थ्यांनीही चित्रकला स्पर्धेत विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना स्वच्छता अभियानाचे संदेश दिले. अनेकांनी बक्षिसांची लयलूट केली असून भाग घेणार्‍या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात आले. महोत्सवात विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली असून महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनीही सदर महोत्सवात आपली कला सादर केली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोफत महाआरोग्य शिबिरात गरजू हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी मोफत औषधे, चष्मे व च्यवनप्राश वितरण करण्यात आले. महोत्सवाची सांगता मराठी गीतनृत्याने करित यात थोरा-मोठ्यांनी नृत्य करून महोत्सवाचा आनंद लुटला.

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या वतीने सांस्कृतिक, कला-क्रिडा क्षेत्रातील होतकरू, तरुण, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक कलाकारांना आपले हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रिडा महोत्सवाचे आयोजन गेली 27 वर्षे केली जात आहे. विविध उपक्रमातून आपल्या सुप्त कला गुणांना वाव देण्याची संधी नवोदित कलाकारांना मिळत असते. या व्यासपीठावर तयार झालेले अनेक कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहेत. आधुनिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व महिलांना विशेष ऊर्जा मिळते.
-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply