पेण : प्रतिनिधी
स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग आणि जेएसडब्ल्यूू संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाक्रुळ येथील वाकेश्वर मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 190 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते रामशेठ पाटील, वाक्रुळ सरपंच गणेश गायकर, शेतकरी कुकुटपालन जिल्हा अध्यक्ष अनिल खामकर, युवा कार्यकर्ते गजानन मोरे, मयूर वनगे यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये पोटाचे विकार, संधिवात, आम्लपित्त, नेत्ररोग, संधिवात, आमवात, सांध्यांचे विकार, मणक्याचे विकार, मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार, हृदयरोग, श्वसनाचे विकार, त्वचारोग, दातांचे विकार, गर्भाशयाचे विकार याबाबतच्या तपासण्या करण्यात आल्या. जेएसडब्ल्यू संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. श्रद्धा शिंदे, डॉ. पलक शर्मा आदिंनी शिबिरार्थींची आरोग्य तपासणी केली. त्यांना सोनाली थळे, रसिका पाटील, ओमकार काटक, सिद्धार्थ शिंदे, विनीत पाटील, कल्पेश मोकल यांनी सहकार्य केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष टेंबे, उपाध्यक्ष रोशन टेमघरे, सुधिर पाटील, पंढरी रूपकर, किशोर निकम, महेश भिकावले, अनिकेत थोरवे, शिरीष सावंत, चंद्रकांत ढाकवळ, नंदू सावंत आदी संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.