पेण : प्रतिनिधी
जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात शांतता कमिटीची आढावा बैठक नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत पेण येथील उद्योजक राजू पिचिका यांची शांतात कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गणेशोत्सव कालावधीत पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दिली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस दल, राष्ट्रीय मार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. उद्योजक राजू पिचिका यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.