Breaking News

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन साजरे

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आविष्कार’या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. हा कार्यक्रम ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे वाईस चेअरमन प्रवक्ते वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका अरुणा भगत, कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, सरचिटणीस लीना पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, युवा नेते हॅप्पी सिंग, संदीप तुपे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता सोळंकी, स्वप्नाली म्हात्रे, खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांचा त्यांनी नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता 250 शैक्षणिक टॅब दिल्याबद्दल पॅरेंट्स टीचर्स कमिटीच्या वतीने या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये आणि परीक्षांमध्ये सहभाग घेऊन सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या वेबसाइटचेही उद्घाटन करण्यात आले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply