पनवेल : रामप्रहर वृत्त
लाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. 5) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोप देण्यात आला. शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानीही लाडका बप्पा विराजमान झाला होता. पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिवाजीनगर येथील तलावामध्ये त्याचे भावपुर्ण वातावरणात विर्सजन करण्यात आले. पनवेल परिसरातील गावागावांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार गणपती विसर्जन करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, श्रीधर ठाकूर, कृष्णा ठाकूर, भरत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, विशाल ठाकूर, भुषण ठाकूर, भारत ठाकूर, मयूर ठाकूर, प्रतीक ठाकूर, छाया कृष्णा ठाकूर, रजनी भरत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, योगिता विशाल ठाकूर, पूनम भूषण ठाकूर, प्रिया भारत ठाकूर, प्रियांका मयूर ठाकूर, श्वेता प्रतीक ठाकूर यांच्यासह कुटूंबीय उपस्थित होते.
उरण : गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी पूजा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींना व गौरी मातेला भाविकांनी सोमवारी (दि. 5) भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. उरण नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विमला तलाव, भवरा तलाव, मोरा जेट्टी येथे गणेश मूर्तींना विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, नगर सहाय्यक रचनाकार सचिन भातुसे, कर निरीक्षक संजय दापसे, नागरी संरक्षण दलचे विलास पाटील, अनिरुद्ध अॅकॅडमी डिझास्टर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उरण नगर परिषदेचे विमला तलाव येथे मूर्ती विसर्जन करण्यासाठी यंदाही देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थांनी सहकार्य केले.