Breaking News

पेणमधील बेकरीवर कारवाईचे आदेश

पेण ः प्रतिनिधी

पेण शहरातील एका बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेकर्‍यांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत.पेण येथील अरविंद गुरव हे एका हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्टा आढळली. हॉटेल मालकाकडे याबाबत विचारणा केली असता हॉटेल मालकाने पाव रामवाडी येथील एका बेकरीतून आल्याचे सांगितले. अरविंद गुरव यांनी तत्काळ अन्न आणि औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्याशी संपर्क केला आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला. निरीक्षक रजेवर असल्याने येत्या दोन दिवसांत आम्ही पाहणी करून बेकर्‍यांवर कारवाई करू असे उत्तर दिले. या नंतर त्यांच्याकडून बेकर्‍यांची पाहणी करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply