रत्नागिरीतील घटना; पतीसह तिघांना अटक
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीत घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची जाळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून स्वप्नाली सावंत यांच्या पतीचा यात समावेश आहे.
सुकांत उर्फ भाई सावंत असे आरोपीचे नाव असून तो शिवसेना नेता आहे. त्याने पत्नी स्वप्नालीला गणेश चतुर्थीच्या दिवशी पेट्रोल टाकून जिवंत जाळले. यानंतर राख समुद्रात टाकली. पोलिसांनी सुकांतबरोबरच त्याचे दोन साथीदार रूपेश उर्फ छोटा सावंत आणि प्रमोद उर्फ पम्या गवनांग यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वप्नाली सावंत 1 सप्टेंबरपासून मिर्या इथल्या घरातून बेपत्ता होत्या. विशेष म्हणजे स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत यानेच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रत्नागरी पोलिसांनी कसून तपास करत हत्येचा उलगडा केला.