उरण : बातमीदारसाप्ताहिक प्रांजलचे संपादक, तसेच इतर वृत्तपत्रांत काम करणारे पत्रकार घन:श्याम (राजाभाई) कडू यांनी आपला 50वा रायगड जिल्हा परिषदेच्या रानसई येथील शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना आईस्क्रिम, बिर्याणी आणि इतर खाऊ देण्यात आला. त्याचबरोबर शाळेला लेझीम संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमास उद्योगपती नरेश भोईर, संतोष ठाकूर, कौशिक ठाकूर, शाळेचे शिक्षक किशोर शिरपूरकर व मोरेश्वर ठाकरे उपस्थित होते.
Check Also
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९वी जयंती …
RamPrahar – The Panvel Daily Paper